Manasvi Choudhary
काल अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं.
एअर इंडियाचं 787-8 ड्रीमलाइनर विमान होतं ज्यामध्ये 242 प्रवासी आणि इतर कर्मचारी होते.
अहमदाबादच्या मेघानी परिसरात हा अपघात घडला. यामध्ये एकूण 265 जण मृत्यूमुखी पडले.
यानंतर या अपघातातील मृतांच्या वारसांना भरपाई कशी मिळेल असा प्रश्न आहे.
माहितीनुसार, अपघातातील मृतांना विमान कंपनीकडून तसेच वैयक्तिक प्रवास विम्याद्वारे मिळते.
अहमदाबाद अपघातातील मृतांच्या वारसांना 1.4 कोटी रूपयांची भरपाई कंपनीकडून मिळणार आहे.
याशिवाय ज्या प्रवांशाकडे वैयक्तिक प्रवास विमा असेल त्यांना विमा कंपनीकडून स्वंतत्रपणे भरपाई मिळेल.
विमा असलेल्या प्रवाशांच्या वारसांना २५ लाख ते १ कोटी रूपये भरपाई मिळू शकते.