Surabhi Jayashree Jagdish
आजकाल बहुतेक कामं डिजिटल पद्धतीने होतात जसं की ऑनलाइन पेमेंट.
ऑनलाइनच्या सोयी असूनही अजूनही अनेक ठिकाणी कॅशची गरज भासते, जसं की लग्नसमारंभ, उपचारासाठी किंवा दैनंदिन खर्चांसाठी.
अशा परिस्थितीत अनेक लोक घरात कॅश ठेवतातच, पण मनात संभ्रम असतो की घरात कॅश ठेवणं योग्य आहे का?
इनकम टॅक्स विभागाने कॅश ठेवण्याची कोणतीही ठराविक मर्यादा निश्चित केलेली नाही.
तुम्ही घरात लाखो रुपये ठेवू शकता, पण अट ही आहे की ते पैसे तुमच्याकडे वैध मार्गाने आलेले असावेत.
ते पैसे तुमच्या कमाईतून किंवा योग्य स्त्रोतांतून आलेले असावेत. जर टॅक्स विभागाने विचारले तर तुम्हाला सांगता आले पाहिजे की पैसा कुठून आला.
इनकम टॅक्स कायद्याच्या काही धारांचा, जसे की 68 ते 69B, येथे संबंध येतो. या धारांनुसार, स्त्रोत नसलेले पैसे चुकीचे मानले जातील.