एका दिवसात किती चमचे चिया सिड्स खाल्ले पाहिजेत?

Surabhi Jayashree Jagdish

चिया सिड्स

चिया सिड्स आरोग्यासाठी वरदान मानलं जातं. या बियांच्या सेवनामुळे व्यक्ती निरोगी आणि फिट राहू शकतो, विशेषतः वजन कमी करण्यासाठी त्यांना अत्यंत फायदेशीर मानले जाते

पोषक घटक

चिया सिड्समध्ये प्रोटीन, फायबर, फॉस्फरस, कॉपर, सेलेनियम, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि ओमेगा फॅटी अॅसिड यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात.

आरोग्यासाठी फायदेशीर

चिया सिड्स पचनसंस्था मजबूत करण्यात आणि वजन नियंत्रित ठेवण्यात मदत करतात.

रोज किती प्रमाणात खाव्यात

तज्ज्ञांच्या मते, चिया बिया रोज एक चमचा म्हणजेच १५ ते ३० ग्रॅम खाणे योग्य आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते.

सेवन करण्याची योग्य पद्धत

चिया सिड्स पाणी किंवा दह्यात रात्रभर भिजवून खाणं सर्वांत योग्य मानलं जातं.

इतर पर्याय

त्या सलाड, बेक केलेल्या पदार्थांमध्ये किंवा स्मूदीमध्येही मिसळून खाल्ल्या जाऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा की रात्रभर किंवा काही तास भिजवल्यानंतरच त्यांचे सेवन करावे.

मर्यादित सेवन आवश्यक

चिया बिया मर्यादित प्रमाणातच खाव्यात. त्यांचे अति सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा