Classic 350 fuel tank capacity: किती लिटर पेट्रोलमध्ये फुल होते Classic 350 बुटेलची टाकी?

Surabhi Jayashree Jagdish

रॉयल एनफील्ड क्लासिक 350

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ही बाईक भारतीय बाजारात खूप लोकप्रिय आहे. या बाईकला तिच्या खास डिझाइनमुळे आणि दमदार इंजिनमुळे पसंती मिळते. या बाईकची पेट्रोल टाकी किती लिटरची आहे, हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

Royal Enfield Classic 350 specifications | saam tv

पेट्रोल टाकीची क्षमता

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 च्या पेट्रोल टाकीची क्षमता साधारण 13 लिटर आहे. कंपनीच्या माहितीनुसार, टाकीची क्षमता 13 लिटर असून त्यात थोडा फरक असू शकतो. पेट्रोल कमी झाल्यावर साधारण 4 लिटरच्या आसपास कमी इंधनाचा इशारा मिळतो.

Classic 350 fuel gauge | saam tv

इंजिनची क्षमता

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 मध्ये 349 सीसीचं इंजिन आहे. हे इंजिन बाईकला चांगली ताकद देते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर आणि लांबच्या प्रवासात ही बाईक वापरता येते

Royal Enfield Classic 350 features | saam tv

बाईकचे मायलेज

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 साधारणपणे एका लिटर पेट्रोलमध्ये 35 ते 40 किलोमीटर चालते. मात्र प्रत्यक्ष मायलेज रस्त्यांची स्थिती, वाहतूक आणि बाईक चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक बाईकचे मायलेज सारखे असेलच असे नाही.

Classic 350 single cylinder engine | saam tv

पेट्रोल टाकीचं डिझाइन

क्लासिक 350 च्या पेट्रोल टाकीला पारंपरिक आणि आकर्षक डिझाइन दिलंय. या टाकीमुळे बाईकला तिचा खास रॉयल लूक मिळतो. बाईकच्या एकूण डिझाइनमध्ये पेट्रोल टाकीचा महत्त्वाचा वाटा आहे.

Classic 350 air oil cooled engine | saam tv

इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि फ्युएल गेज

या बाईकमध्ये अ‍ॅनालॉग स्पीडोमीटर आणि डिजिटल डिस्प्ले असलेले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते. त्यामध्ये फ्युएल गेज दिलेले आहे, ज्यामुळे टाकीत किती पेट्रोल शिल्लक आहे याचा अंदाज येतो. पेट्रोल कमी झाल्यावर डिस्प्लेवर त्याचा इशाराही दिसतो.

Classic 350 fuel efficiency | saam tv

सिंगल सिलेंडर

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 मध्ये सिंगल सिलेंडर आणि एअर-ऑइल कूल्ड इंजिन दिलेत. या प्रकारच्या इंजिनमध्ये हवा आणि तेलाच्या मदतीने इंजिन थंड ठेवलं जातं. हे इंजिन बाईकला चांगली कामगिरी करण्यास मदत करतात.

Classic 350 bike details | saam tv

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

Kolhapur Tourism | saam tv
येथे क्लिक करा