Surabhi Jayashree Jagdish
आज आपण इतिहासात मागे डोकावून छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा येत होत्या हे जाणून घेऊया
शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले आणि ज्येष्ठ बंधू संभाजी हे संस्कृत तसंच अन्य काही भाषांचे चांगले जाणकार असल्याची माहिती मिळते.
अनेकांना प्रश्न पडतो की, छत्रपती शिवाजी महाराजांना किती भागा येत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठी आणि संस्कृत या भाषेत छत्रपती शिवाजी महाराज अस्खलित होते.
शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहारकोश हा संस्कृत भाषेतील शब्दकोश तयार करून घेतला.
त्या काळात फारसी ही राजभाषा असल्यामुळे शिवाजी महाराजांना फारसी भाषेची माहिती असणं स्वाभाविक आहे.
काही ठिकाणी उल्लेख केल्यानुसार, त्यांना हिंदी भाषा अवगत होती. संबंधित माहिती 'उत्तर' या वेबसाईटवर देण्यात आलीये.