एकाच एक्स्टेंशन बोर्डवर मोबाईल चार्जर, Laptop, WiFi राउटर लावावं का?

Bharat Jadhav

धोकादायक

आपल्या घरांमध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची संख्या सतत वाढत आहे. एकाच सॉकेटवरून अनेक उपकरणे चालवण्यासाठी आपण अनेकदा 'एक्सटेन्शन बोर्ड'चा वापर करतो. हे दिसायला लहान आणि सोयीस्कर वाटत असले, तरी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त उपकरणे त्यांना जोडणे धोकादायक ठरू शकते.

Can you connect a mobile charger, laptop and Wi-Fi router to one extension board

शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची भीती

अनेकदा अतिभार म्हणजेच ओव्हरलोडिंग एक्स्टेंशन बोर्डमधील तारा तापू लागतात. प्लास्टिक वितळू शकते आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, एक्स्टेंशन बोर्डमध्ये किती उपकरणे सुरक्षितपणे जोडता येतील आणि कोणती उपकरणे त्याद्वारे चालवू नयेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Can you connect a mobile charger, laptop and Wi-Fi router to one extension board

एक्स्टेंशन बोर्डमध्ये किती उपकरणे जोडणे सुरक्षित असते?

हे त्यावरील उपलब्ध सॉकेट्सच्या संख्येवरून ठरत नाही, तर त्याच्या विद्युत क्षमतेवरून म्हणजेच, ते सुरक्षितपणे किती वीज हाताळू शकते, यावरून ठरते. घरांमध्ये सामान्यतः वापरले जाणारे एक्स्टेंशन बोर्ड १००० वॅट्स ते १५०० वॅट्सपर्यंतचा भार पेलण्यासाठी डिझाइन केलेले असतात. प्रत्येक बोर्डची क्षमता वेगवेगळी असू शकते.

Can you connect a mobile charger, laptop and Wi-Fi router to one extension board

मोबाईल चार्जर, लॅपटॉप, WiFi राउटर एकाचवेळी लावावे का?

मोबाईल चार्जर, लॅपटॉप, वाय-फाय राउटर आणि टीव्ही यांसारखी कमी वीज वापरणारी उपकरणे एकाच वेळी चालवणे साधारणपणे सुरक्षित असते, मात्र, त्यांची एकूण वीज वापरण्याची क्षमता ही पॉवर बोर्डच्या निर्धारित क्षमतेच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे.

Can you connect a mobile charger, laptop and Wi-Fi router to one extension board

या गोष्टीकडे द्या लक्ष

पॉवर बोर्ड वापरण्यापूर्वी त्यावर नमूद केलेली वॅटेज (wattage) आणि ॲम्पिरेज (amperage) रेटिंग्ज तपासून घ्या. सॉकेट रिकामे आहे म्हणून त्यात दुसरे उपकरण जोडणे सुरक्षित असेलच, असे नाही.

Can you connect a mobile charger, laptop and Wi-Fi router to one extension board

कोणती उपकरणे एक्स्टेंशन बोर्डला जोडू नयेत?

काही घरगुती उपकरणे खूप जास्त वीज वापरतात. इलेक्ट्रिक केटल आणि रूम हिटरसारखी उपकरणे १,२०० ते १,५०० वॉटपर्यंत वीज वापरू शकतात. गीझर आणि मायक्रोवेव्हसारखी उपकरणे सुमारे २,००० ते २,२०० वॅट्स किंवा त्याहूनही अधिक पॉवर खेचत असतात. या रेफ्रिजरेटर, एअर फ्रायर, टोस्टरही एक्स्टेंशनला जोडू नये.

Can you connect a mobile charger, laptop and Wi-Fi router to one extension board

ओव्हरलोडिंगच्या वेळी काय घडते?

जेव्हा एक्स्टेंशन बोर्डला जोडलेल्या सर्व उपकरणांचा एकूण वीज वापर त्याच्या निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त होतो, तेव्हा त्यातील तारा आणि जोडण्या म्हणजेच कनेक्शन्स गरम होऊ लागतात. तारांवर असलेले संरक्षक प्लास्टिकचे आवरण वितळू शकते. यामुळे तारांचे उघडे भाग एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो.

Can you connect a mobile charger, laptop and Wi-Fi router to one extension board