Surabhi Jayashree Jagdish
दररोज ५ किलोमीटर चालणं हे केवळ वजन कमी करण्यासाठीच उपयुक्त नाही तर ही सवय एकूण आरोग्य सुधारण्यासाठीही खूप महत्त्वाची आहे. नियमित चालण्याने शरीर अधिक सक्रिय राहते.
जर तुम्ही निवांत गतीने चालत असाल तर ५ किलोमीटर चालायला वेळ लागतो. साधारणपणे यासाठी ४५ मिनिटे ते १ तास लागू शकतो. ही वेळ व्यक्तीच्या चालण्याच्या वेगावर अवलंबून असते.
हा वॉक रोजच्या दिनक्रमाचा भाग केला तर मोठा फरक जाणवतो. शरीरासोबत मनातही हळूहळू चांगले बदल दिसतात. ताण कमी होतो.
दररोज ५ किलोमीटर चालल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हृदयाशी संबंधित त्रासाचा धोका कमी होऊ शकतो. रक्ताभिसरण सुधारण्यासही याचा फायदा होतो.
चालण्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. ही एक सुरक्षित आणि सोपी पद्धत आहे.
रोज ५ किलोमीटर चालल्याने कॅलरी जास्त प्रमाणात बर्न होतात. वजन कमी करण्यासाठी हे विशेष फायदेशीर ठरते. नियमिततेमुळे परिणाम अधिक चांगले मिळतात.
दररोज वॉक केल्याने साधारण २५० ते ३५० कॅलरी बर्न होऊ शकतात. हे प्रमाण तुमच्या वेग आणि वजनावर ठरतं. ही एक प्रभावी कार्डिओ एक्सरसाइज मानली जाते.