Bharat Jadhav
तुम्ही प्रथिनांसाठी उकडलेली अंडी खात असाल त्या ते साठवून ठेवत असला तर ते घातक ठरू शकते. अधिक काळ अंडी टिकवून ठेवल्यानं पौष्टिक आहार असलेली अंडी हानिकारक जीवाणूंची पैदास करण्याचे ठिकाण बनू शकतात.
एकदा का अंडे उकडले की, त्याचे नैसर्गिक संरक्षक कवच नाहीसे होते, ज्यामुळे ते दूषित होण्याचा धोका निर्माण होतो. अन्नातून होणारे आजार टाळण्यासाठी उकडलेली अंडी सुरक्षितपणे खाण्याबाबत आणि साठवण्याबाबत योग्य माहिती हवी.
उकळल्यामुळे अंड्याचा नैसर्गिक संरक्षक थर, ज्याला क्यूटिकल म्हणतात, निघून जातो. हे नैसर्गिक कवच नसल्यामुळे, जिवाणू सच्छिद्र कवचात सहजपणे प्रवेश करतात.
उकडलेली अंडी सामान्य तापमानात साठवल्याने अंड्यात साल्मोनेलासारख्या हानिकारक जिवाणूंची वाढ वेगाने होते. जर आपण ते अंडी खाल्ली तर अन्न विषबाधा होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, उकडलेली अंडी कधीही बराच वेळ खोलीच्या तापमानावर (रूम टेम्परेचरवर) ठेवू नयेत. ती उकडल्यानंतर दोन तासांच्या आत खाल्ली पाहिजेत.
जर वातावरणाचे तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तर पूर्ण सुरक्षिततेसाठी उकडलेली अंडी एका तासाच्या आत खावीत.
जर तुम्ही उकडलेली अंडी आधीच तयार करून ठेवणार असाल, तर ती त्वरित रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
न सोललेली, पूर्ण उकडलेली अंडी सतत थंड तापमानात साठवून ठेवल्यास सात दिवसांपर्यंत ताजी आणि खाण्यायोग्य राहतात.