Taj Mahal: ताजमहाल इतका भक्कम कसा उभा आहे? खोल पाया आणि तळाशी असलेल्या विहिरींचं गुपित काय?

Surabhi Jayashree Jagdish

ताजमहाल

ताजमहाल हा सौंदर्याचा एक अद्भुत नमुना मानला जातो. यमुना नदीच्या काठावर उभ्या असलेल्या या वास्तूचा पाया अत्यंत मजबूत पद्धतीने बांधलेला आहे. अनेक वर्षे पाण्याच्या जवळ असूनही ताजमहाल आजही भक्कम उभा आहे.

तळाशी काय आहे?

मात्र तुम्हाला माहितीये का ताजमहालच्या तळाशी नेमकं काय आहे? ताजमहालचा तळ किती खोल आहे आणि त्याच्या खाली नेमकं काय आहे, हे जाणून घेऊया.

ताजमहालचा तळ

इतिहासकार आणि पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मते ताजमहालचा पाया सुमारे 50 ते 60 फूट खोल आहे. हा खोल पाया यमुना नदीच्या काठावरील मऊ आणि ओलसर माती लक्षात घेऊन बांधण्यात आला.

तळासाठी विहिरीसारखी रचना

ताजमहालचा पाया योग्य पद्धतीने बांधला गेला. यामध्ये अनेक गोलाकार विहिरी खोदून त्यात दगड आणि चुन्याचा वापर करण्यात आला. ही पद्धत पाण्याजवळील जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते.

दगड आणि लाकडाचा वापर

पायाच्या आत मोठे दगड, विटा आणि लाकडी खांब बसवण्यात आलेत. लाकूड कायम ओलसर राहिल्यास अधिक मजबूत राहतं हे मुघलांना माहिती होतं. म्हणूनच तळाशी लाकडाचा वापर मुद्दाम करण्यात आला.

यमुना नदीचे पाणी

ताजमहालच्या तळाशी यमुना नदीचं पाणी सतत संपर्कात राहील अशी रचना करण्यात आली. या ओलाव्यामुळे लाकडी खांब कुजण्याऐवजी अधिक घट्ट झाले. नदीचे पाणी कमी झाल्याने आज तळाच्या मजबुतीवर परिणाम होतो, अशी चिंता व्यक्त करण्यात येतेय.

तळाची रचना

इतक्या प्रचंड संगमरवरी वास्तूचा भार सहन करण्यासाठी तळ खास डिझाइन करण्यात आला. हा भार समान पद्धतीने जमिनीवर विभागला जातो. यामुळे ताजमहाल शेकडो वर्षांपासून उभा आहे.

तळाशी कोणतीही गुप्त दालन नाही

अनेक कथांनुसार ताजमहालच्या तळाशी गुप्त बोगदे किंवा दालनं असल्याचा उल्लेख आढळतो. मात्र पुरातत्त्व सर्वेक्षणानुसार याबाबत ठोस पुरावा सापडलेला नाही. तळाचा मुख्य उद्देश केवळ मजबुती आणि स्थिरता हाच होता.

Borivali Tourism: थंडीच्या दिवसात बाहेर भटकायला जायचंय? लांब न जाता बोरिवलीच्या या ठिकाणी फिरून या

येथे क्लिक करा