Manasvi Choudhary
निपाह व्हायरस संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा व्हायरस वेगाने पसरत आहे.
निपाह व्हायरस संसर्गजन्य आजारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निपाह व्हायरसचा संसर्ग वटवाघूळ आणि डुकरांपासून होतो.
निपाह व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. एका संक्रमित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला याची लागण होते.
निपाह व्हायरसचे विषाणू वटवाघूळांच्या लाळेमध्ये असल्याने या पक्ष्यांनी खाल्लेली फळे माणसाने खाल्यास हा आजार शरीरात पसरल्याचे समोर आले आहे.
ताप, डोकेदुखी, कफ, घसादुखी आणि श्वास घ्यायला अडथळा येणे ही निपाह व्हायरसची प्रमुख लक्षणे आहेत.
काही वेळेला रूग्णांमध्ये मेंदूला सूज आणि न्यमोनिया होण्याची देखील शक्यता आहे.
निपाह व्हायरसचा संसर्ग झाल्याची लक्षणे आजारी व्यक्तीस ४ ते १४ दिवसांच्या कालावधीत दिसू लागतात.
RT-PCR चाचणी
वैद्यकीय सल्ल्यानुसार RT-PCR ही चाचणी करून निपाह व्हायरस संसर्ग झाल्याचे निदान होईल.