Ankush Dhavre
भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला कित्येक वर्षांचा इतिहास आहे.
इतिहास पाहिला, तर या शहराला मोम्बेन, मोम्बेम, मोम्बेम,बॉम्बे, बॉम्बेन, बॉम्बेम, बाम्बेय, बॉम्बेय, बून बे आणि बॉन बाहिया असे नाव देण्यात आले.
मात्र १९९५ मध्ये या शहराचं नाव बदलून मुंबई ठेवण्यात आलं.
पर्शियन लेखक अली मुहम्मद खान यांनी १५०७ यांनी लिहिलेल्या एका मजकूरात या शहराचा उल्लेख मानबाई असा केला होता.
शहराचे पहिले रहिवासी असलेल्या स्थानिक कोळी मच्छीमार समुदायाने त्याला 'मुंबई' असे संबोधले
हे नाव कोळी देवी मुंबादेवीच्या नावावरून पडले असल्याचे मानले जाते.
पण युरोपियन आक्रमणादरम्यान, पोर्तुगीज लोकांनी शहराला 'बॉम्बैम' असे संबोधले, या शब्दाचा अर्थ 'चांगला उपसागर' असा होतो
१९९५ मध्ये जेव्हा शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत आली त्यावेळी त्यांना ब्रिटिश वसाहतवादाचा वारसा सोडून द्यायचा होता
नोव्हेंबर ११९५ मध्ये, केंद्र सरकारने अधिकृतपणे इंग्रजी नाव बदलून मुंबई असे ठेवले.