ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उत्तरकाशीतील गोमुख येथून उगम पावणाऱ्या नदीला भागीरथी नदी म्हणून ओळखले जाते.
अलकनंदा नदीसोबत देवप्रयाग येथे संगम झाल्यानंतर भागीरथी नदीला 'गंगा' म्हणून ओळखले जाते.
राजा भगीरथांनी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी तप केला, म्हणूनच नदीला भागीरथी हे नाव देण्यात आले आहे.
राजा भगीरथाच्या कठोर तपश्चर्येने संतुष्ट होऊन ब्रह्मदेवांनी गंगा नदीला पृथ्वीवर पाठवण्याचे ठरवले.
यानंतर गंगा देवीने पृथ्वीवर अवतरण केल्यामुळे या नदीला भागीरथी असे नाव देण्यात आले.
गंगेचा प्रचंड वेग पृथ्वी सहन करू शकत नव्हती, म्हणून शिवशंकरांनी तिला आपल्या जटांमध्ये अडकवले.
यानंतर पृथ्वीवर पाणी सोडण्यात आले.