Sakshi Sunil Jadhav
जोडीदाराकडून धन लाभाची शक्यता आहे. जोडीदाराच्या कुटुंबीयांकडून चांगले संबंध आज प्रस्थापित होतील.
व्यवसायामध्ये नवीन वाटा, नवीन दिशा आज सापडणार आहेत. महत्त्वाच्या बैठका पार पडतील. कोर्टाच्या कामातही यश मिळेल.
आजोळी प्रेम वाढेल. मामाशी संबंध दृढ होतील. तब्येतीच्या मात्र थोड्या तक्रारी आज राहतील.
प्रेमामध्ये सफलता प्राप्त होणार आहे. आपले साधेपण आपल्या पार्टनरला आवडेल. एकूण चांगले हितगुज होईल.
घरामध्ये नवीन काहीतरी खरेदी होईल. कामाच्या ठिकाणी पत आणि सन्मान मिळतील.
बौद्धिक गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन यश मिळवाल. हिशोबाला चोख असणारा आजचा दिवस आहे.
धनाची आवकजावक उत्तम राहील. सोने खरेदी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. दिवस चांगला आहे.
सकारात्मकता वाढीला लागेल. मनासारख्या घटना घडतील. आरोग्य उत्तम राहील.
वायफळ पैसा खर्च होईल.ताकास तूर लागणार नाही. निर्णय घेतला असेल तर अनेक बाबतीत आज संभ्रम राहील.
मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात आज राहाल. आपले कोण परके कोण याची जाणीव होईल. ॉ
समाजामध्ये मान उंचावून जाल. सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन कामे करा. स्वतःच्या आत्मविश्वास आज बळावलेला राहील.
दत्तगुरूंची विशेष कृपा आज आपल्यावर राहणार आहे. उपासना फलदायी ठरणार आहे.