Sakshi Sunil Jadhav
पैशाला पैसा जोडणं आज महत्त्वाचे आहे. काही वेळेला अशी साखळी पुढील भवितव्यासाठी महत्त्वाची ठरते.
रसिकता जपून अनेक कामे कराल. ठरलेल्या गोष्टी वेळेत झाल्यामुळे मनाला स्वास्थ मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
काय करावे आणि काय करू नये अशा काहीशा संभ्रमात असाल. महत्वाचे निर्णय घेताना तारेवरची कसरत होईल.
एखादी नवीन भाषा अवगत करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रगतीच्या दृष्टीने द्वारे खुली होतील.
जे ठरवाल ते होईलच असा आजचा दिवस उदयाला आलेला आहे. आपल्या वरिष्ठ लोकांची विशेष मर्जी आपल्यावर आहे.
भाग्याला कलाटणी मिळणारा आजचा दिवस आहे. देवाने भरभरून दान आपल्याला दिले आहे. आपल्या क्षमतेची चाचणी घेऊनच आज पुढे जाल.
अचानक धनलाभाची आज शक्यता आहे. प्रयत्नांना यश मिळेल. पण खडतर प्रयत्न करावे लागतील. एकाहाती सत्ता घेतलेले आज बरे राहील.
जोडीदाराबरोबर हितगुज साधावे. प्रेमाला उधाण येईल. एकमेकांसाठी सहकार्य केल्यामुळे नाते वृद्धिंगत होईल. दिवस संमिश्र आहे.
पोटाविषयी, उष्णतेचे, मुळव्याधविषयी, मानसिक आजार आज त्रस्त करतील. धीराने आजच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.
शिवकृपाशीर्वाद विशेष आपल्यावर राहणार आहेत. संततीकडून मनासारख्या घटना घडतील. प्रेरणादायी दिवस आहे.
देवा विषयी आपल्या भावना विशेष सकारात्मक भाव नाहीत. पण आज काही गोष्टी अशा होतील आपल्याला धार्मिक कार्यात घरगुती कार्यक्रमात सहभाग घ्यावा लागेल.
बहिण - भावाचे कामाविषयी विशेष सहकार्य मिळेल. पराक्रमामध्ये भर पडेल. जवळचे प्रवास होतील.