Sakshi Sunil Jadhav
दिवस एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आलेला आहे. यश म्हणजे काय असते हे आज जाणवेल. अनेकांकडून वाहवा मिळेल. काम करण्यासाठी नवी दिशा आणि नवे मार्ग आज सापडतील.
सर्व गोतावळ्यामध्ये आपण एकटेच आहोत ही भावना आज दाट होईल. कामे तर ढीगभर असतील पण चेव मात्र कणभरही नसेल. वाहने घातपात, अपघात यापासून स्वतःची काळजी घ्या.
"अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर" असा काहीसा दिवस आहे. कितीही केले तरी संसारिक गोष्टी थांबत नाहीत. आज यामध्येच अधिक व्यस्तता जाणवेल.
मनाची उगाचच घालमेल होईल. घडून गेलेल्या गोष्टींविषयी अधिक खल आज नकोच. दिवसाची सुरुवात चांगली होईल पण शेवटी त्रस्तता असेल.
पाठीचा कणा, हृदयाचे विकार या गोष्टींपासून आज स्वतःला जपावे लागेल. आज केलेली उपासना फलदायी होईल. शेअर्स मध्ये लॉटरीमध्ये पैशाची गुंतवणूक केल्यास धनवृद्धी होईल.
जन्माला आलो आहोत तर जगून घ्यावे असे काहीशी भावना होईल. वाहनसौख्य, गृह सौख्य अर्थात याची खरेदी करणारा असाल तरी सुद्धा दिवस चांगला आहे.
भावंड सौख्य उत्तम आहे. आपल्या मागे अडचणीच्या वेळी खंबीर उभे राहणारे कोणीतरी आहे हे जाणवून मन स्वस्थ होईल. प्रेमाला नव्याने उभारी येईल.
तिखट मसालेदार खाण्यापिण्याची आवड आज विशेष दाटेल. जोडीदाराच्या तब्येतीची मात्र काळजी घ्यावी लागेल. दिवस आनंदात जाईल.
"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" नुसत्याच कल्पनेची इमले बांधून कामे होत नसतात. आज कल्पनेच्या भराऱ्या घेण्यापेक्षा नियोजनामध्ये व्यस्त रहा.
"सोबतीचा करार"अशी काही नाती असतात. या नात्यांमधून चांगले वाईट काही झाले तरी आपलेसे करावे लागते. जवळच्या लोकांकडून त्रासदायक अनुभव येतील. मनस्वास्थ्य खराब राहील.
सून जावई हे नाते अगदी दुधावरच्या साई सारखे नाते असते. आज आपल्याला यांच्याकडून विशेष स्नेह, माया मिळेल. ज्यामुळे दिवसाचे भारावलेपण असेल.
जितके काम कराल तेवढी प्रगती होईल. असा दिवस आहे केलेल्या कामाचे सार्थक झाले आहे अशी जाणीव होईल. वरिष्ठ आणि कनिष्ठांबरोबर सहकारी यांची प्रगती होईल.