Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात शिरा, उपमा, इडली, आप्पे किंवा डोसा यांसारखे अनेक चवदार पदार्थ बनवण्यासाठी रवा हा वापरतात.
पण आजकाल बाजारात मिळणारा पॅकेज्ड रवा किती शुद्ध आहे याबद्दल मनात प्रश्न पडतात, तसेच अनेकदा त्यात भेसळही असू शकते. अशा वेळी बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही घरीच सहजपणे गव्हापासून शुद्ध, दाणेदार रवा बनवू शकता.
रवा बनवण्यासठी सर्वातआधी गहू स्वच्छ निवडून घ्या, जेणेकरून त्यात खडे किंवा कचरा असणार नाही. त्यानंतर हे गहू स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्या आणि त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून टाका.
धुतलेले ओले गहू एका स्वच्छ सुती कापडावर सावलीत पसरवून ठेवा. साधारण १५ ते २० मिनिटे गहू सुकवल्यानंतर त्यातील पाण्याचा ओलसरपणा कमी होईल, पण गहू पूर्ण कडक सुकवायचे नाहीत हे लक्षात ठेवा.
आता हे हलके ओले गहू मिक्सरच्या भांड्यात थोडे-थोडे करून टाका आणि मिक्सर चालू-बंद करत गव्हाची भरड करून घ्या. मिश्रण पिठासारखे अतिशय बारीक होणार नाही याची काळजी घ्या.
दळलेले मिश्रण प्रथम बारीक चाळणीतून चाळून घ्या. त्यानंतर चाळणीत राहिलेला जाडसर दाणेदार भाग, रवा असलेल्या जाडसर चाळणीत ओता आणि पुन्हा एकदा चांगले गाळून घ्या, जेणेकरून बारीक पीठ वेगळे होईल आणि परफेक्ट रवा हातात येईल.
अशाप्रकारे तयार झालेला घरगुती शुद्ध आणि दाणेदार रवा कढईत कोणतेही तेल किंवा तूप न घालता मंद आचेवर हलकासा भाजून घ्या