Manasvi Choudhary
साऊथ इंडियन दही वडा ही स्पेशल डिश आहे. घरच्या घरी देखील तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने साऊथ इंडियन स्टाईल दही वडा रेसिपी ट्राय करू शकता.
दही वडा रेसिपी करण्यासाठी सर्वप्रथम चार तास आधी उडीद डाळ भिजत घाला आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. वाटलेल्या मिश्रणात नंतर चवीप्रमाणे मीठ मिक्स करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये वडे चांगले खरपूस तळा आणि वेगळे करून घ्या.
दुसऱ्या बाजूला एका भांड्यात दही पाणी न मिक्स करता घुसळून घ्या. त्यात चवीप्रमाणे साखर, मीठ, मिरची व आले यांची पेस्ट करून मिक्स करा.
बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही यामध्ये घालू शकता. वडे सर्व्ह करण्यापूर्वी दहीमध्ये वडे घाला नंतर वरून लाल तिखट आणि गोड चटणी घाला.