Manasvi Choudhary
सुंदर दिसण्यासाठी आजकाल सर्वाधिक महिला स्किनकेअर रूटीन फॉलो करतात.
चेहरा स्वच्छ राहण्यासाठी फेसवॉशचा वापर करतात. केमिकलयुक्त फेसवॉशमुळे त्वचेच्या समस्या होतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती फेसवॉश कसा बनवायचा? हे सांगणार आहोत.
घरीच सोप्या पद्धतीने तुम्ही फेसवॉश बनवू शकता. बेसन, दही, हळद आणि गुलाबजल या घरगुती साहित्यापासून तुम्ही फेसवॉश बनवू शकता.
एका भांड्यात बेसन घ्या त्यात नंतर दही मिक्स करा. दोन्ही मिश्रण एकत्र झाल्यानंतर त्यात हळद मिक्स करा.
संपूर्ण मिश्रणात गुलाबपाणी मिक्स करा म्हणजे पेस्ट तयार होईल. पेस्ट जास्त पातळ करू नका.
नंतर ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. ३ ते ५ मिनिटे मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या