Sakshi Sunil Jadhav
आवळ्यात व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असल्याने हे लोणचं आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं.
फारसा वेळ न लागता आणि सहज उपलब्ध साहित्य वापरून हे लोणचं घरी बनवता येतं.
आवळे १० मिनिटे वाफवल्यामुळे त्यांचा कडूपणा कमी होतो आणि लोणच्याची चव जास्त खुलते.
बडीशेप, मेथी, मोहरी, धणे-जिरे वेगवेगळे भाजल्याने लोणच्याला खास सुगंध आणि चव येते.
भाजलेले मसाले जाडसर वाटल्यामुळे लोणच्याची चव आणि पोत दोन्ही उत्तम राहतात.
मसाला घातल्यानंतर किमान एक तास लोणचं मुरू दिल्यास चव व्यवस्थित मुरते.
गरम तेलात मोहरी, लसूण आणि हिंगाची फोडणी थंड करून घातल्याने लोणचं जास्त दिवस टिकतं.
पोळी, भाजी-चपाती किंवा साध्या वरण-भातासोबत हे आवळ्याचं लोणचं खास चव वाढवणारं ठरतं.