Saam Tv
प्रत्येकालाच दररोज जीमला जाणे शक्य नसते. मात्र आता अनेक जण व्यायामच करायला कंटाळतात.
तुम्हाला जर तंदुरुस्त आणि योग्य वयात फीट राहायचे असेल तर तुम्ही वर्कआऊट करणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी काही महत्वाचे व्यायाम तुम्ही घरच्या घरीच करू शकता.
विशेषत: महिलांसाठी हे खूप फायदेशीर आहे. जिममध्ये न जाता वजन कमी करणे आणि तंदुरुस्त राहता येते. चला तर जाणून घेऊ महत्वाचे वर्कआउट.
स्कॉट्स मारल्याने तुमचे पाय, कंबर, मांड्या आणि ग्लूट्सच्या स्नायूंना टोनिंग आणि बळकट करण्यात मदत होते. तसेच फॅट कमी होतो.
तुम्ही घरच्या पायऱ्यांचा चढ-उतार करू शकता. कुठेही लिफ्टचा वापर करू नका.
प्रत्येकाने रोज किमान अर्धा पावून तास चालले पाहिजे. त्याने तुमच्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते आणि चयापचय दर देखील वाढवते त्याने आपण तंदूरुस्त राहू शकतो.
तुमच्या हातांचे स्नायू बळकट करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी पुलअपसह पुशअप करू शकता. हे केवळ तुमच्या हातांचे स्नायूच मजहूत करणार नाहीत तर धाती आणि पोटाच्या स्नायुंना टोन करेल.