ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाऊस पडल्यास किंवा अगदी हलक्या थंडीमुळेदेखील घरात कीटक किंवा झुरळे येणे खूप सामान्य झाले आहे.
बऱ्याचदा असे घडते की, झुरळे स्वयंपाकघरात ठेवलेल्या धान्य आणि अन्नपदार्थांमध्ये शिरतात ज्यामुळे त्या वस्तू फेकून द्याव्या लागतात.
आपल्या घरात स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. जेणेकरून सर्वकाही स्वच्छ आणि योग्य राहील.
परंतु काही घरगुती उपायांनी तुम्ही झुरळांपासून मुक्त होऊ शकता. जाणून घ्या.
लिंबाचा रस काढा आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. घरातून झुरळांना हाकलून लावण्यासाठी हे उपयुक्त ठरु शकते.
तेजपत्ता बारीक करून पावडर बनवा आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जिथे झुरळे आढळतात तिथे शिंपडा. यामुळे झुरळे घरात येणार नाही.
सर्वप्रथम, बेकिंग सोडा आणि साखर या दोन्ही गोष्टी एकत्र करा आणि हा स्प्रे बाटलीत भरा, नंतर जिथे झुरळे येतील तिथे स्प्रे करा.