Manasvi Choudhary
अॅसिडीटीचा त्रास अनेकांना नेहमीच जाणवतो. काही खाल्लं की अॅसिडीटी झाली असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
अॅसिडीटी झाल्याने पोटदुखी, जळजळ, गॅस यासारख्या समस्या होतात.
मात्र अॅसिडीटी झाल्यानंतर काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
अॅसिडीटी झाल्यानंतर तुम्ही हलका आहार घेणे महत्वाचे आहे यामुळे पचनक्रिया सुधारेल.
शरीराची हालचाल होणे गरजेचे आहे एकाच जागी बसल्याने अॅसिडीटीचा समस्या वाढू शकते.
अॅपल व्हिनेगर कोमट पाण्यात टाकून प्यायल्याने अॅसिडीटीला आराम मिळेल.
बडीशेप चावून खाल्ल्याने गॅस, अॅसिडीटीची समस्या कमी होऊ शकते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.