Saam Tv
वास्तूनुसार 'या' रंगांमुळे घरात येईल सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा.
लिव्हिंग रूममध्ये फिकट पिवळा, क्रीम किंवा ऑफ-व्हाइट रंग वापरावा. यामुळे घरात आनंद आणि सकारात्मकता राहते.
बेडरूममध्ये गुलाबी, फिकट निळा किंवा आकाशी रंग योग्य मानला जातो. यामुळे नात्यांमध्ये गोडवा आणि शांतता टिकून राहते.
वास्तूशास्त्रानुसार किचन हे अग्निचे स्थान आहे. त्यामुळे येथे नारंगी किंवा हलका लाल रंग देणे अत्यंत शुभ मानले जाते.
देवघरासाठी पिवळा, पांढरा किंवा फिकट आकाशी रंग सर्वोत्तम आहे. हे रंग अध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यास मदत करतात.
पैसा आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी तिजोरी ठेवलेल्या खोलीत किंवा त्या भिंतीवर हिरवा रंग वापरावा.
दिवाळीच्या काळात घरात काळा किंवा अत्यंत गडद करडा रंग देणे टाळावे. हे रंग नकारात्मकता आणू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही
NEXT : सकाळचा नाश्ता काय बनवावा? ७ दिवसांसाठी ७ झटपट आणि चविष्ट पर्याय