Shreya Maskar
उकडीचे मोदक बनवण्याचे तांदळाचे पीठ, ओलं खोबरं, गूळ, तूप, वेलची पावडर, मीठ आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
उकडीचे मोदक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात ओलं खोबरं परतून घ्या.
या मिश्रणात गूळ घालून चांगले वितळून घ्या.
मिश्रण घट्ट झाले की त्यात वेलची पावडर घाला.
मोदकाचे पीठ बनवण्यासाठी तुपात मीठ , पाणी आणि तांदळाचे पीठ एकत्र करून कणिक मळा.
आता या पिठाचा गोळा घेऊन त्याची छोटी पारी बनवून गुळाचे सारण भरून मोदकाचा आकार द्या.
कुकरमध्ये १५-२० मिनिटे मोदक शिजवून घ्या.
साजूक तुपासोबत मोदकचा आस्वाद घ्या.