ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
होळी म्हटलं की समोर येत ते म्हणजे खमंग, गोड लुसलुशीत पुरणपोळी. या होळीला पुणपोळी बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
१ कप चणा दाळ, मैदा, १ कप गूळ, तेल, आणि वेलची पूड
कुकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून डाळ चांगली शिजवून घ्या. शिजलेल्या डाळीचे पाणी वापरुन कटाची आमटी बनवली जाते.
डाळीतले पाणी काढून डाळीमध्ये किसलेला गूळ घाला आणि मंद आचेवर हे मिश्रण आटवा. आटवताना चमचा ढवळत राहा. यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून मिक्स करा.
मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. गरम असतानाच हे मिश्रण पुरण यंत्रातून वाटून घ्या.
मैदाच्या पीठात ५ ते ६चमचे तेल आणि थोडी हळद घालून पीठ सैलसर मळून घ्या. पीठ तासांसाठी मळून ठेवा. मैदाच्या पीठाचा १ इंचाचा गोळा घ्या आणि पातळ पारी बनवून घ्या.
मैदाच्या पीठाचा १ इंचाचा गोळा घ्या आणि पातळ पारी बनवून घ्या. यामध्ये पुरणाचा १ ते दीड इंचाचा गोळा भरुन सर्व बाजूंनी बंद करुन घ्या. पोळपाटावर थोडा मैदा टाकून पोळी हलक्या हाताने लाटून घ्या.
एका गरम तव्यावर साजूक तूप किंवा तेल लावून ही पोळी खरपूस भाजून घ्या. गरमागरम पुरणपोळी दुधासोबत किंवा आमटीसोबत सर्व्ह करा.