Manasvi Choudhary
सध्या संपूर्ण राज्यभरात ट्रक चालकांनी संप पुकारला आहे.
केंद्र सरकारच्या नव्या कायद्यातील तरतूदी विरोधात ट्रक चालकांनी संप केला आहे.
केंद्र सरकारने हिट अँड रन हा नवीन कायदा आणला आहे. हिट अँड रन कायद्याच्या नवीन तरतुदींअंतर्गत आता वाहनचालक अपघात करून फरार झाला तर त्याला १० वर्षांच्या कारवासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
या कायद्याला देशभरातील वाहनचालकांनी विरोध केला असून कायद्याविरोधात तीन दिवस संप सुरू आहे.
हिट अँड रन या कायद्याअंतर्गत जर एखादा वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास व त्याची माहिती न दिल्यास १० वर्षाचा कारावास आणि ७ लाख रूपये दंड होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला केवळ दोन वर्षे तुरूंगवास होता.
यामुळेच हिट अँड रन या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप केला असून तो कायदा मागे घ्यावा अशी ट्रकचालकांची मागणी आहे.