Sakshi Sunil Jadhav
अंडी हा घरचा संडेचा स्पेशल नाश्ता असतो. कारण अंड्याचे विविध पदार्थ कमी वेळात तयार होतात आणि त्याला चांगली चव असते.
काहीलोक रोजच्या रोज त्यांच्या डाएटमध्ये अंडी खाणं पसंत करतात. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं.
सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारात थोडेफार बदल करणं गरजेचं असतं.
तुम्ही जर उन्हाळ्यात अंडी जास्त प्रमाणात खात असाल तर तुमच्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. पुढे आपण याबद्दल जाणून घेऊयात.
तुम्ही जर उन्हाळ्यात रोज अंडी खात असाल तर शरीरातली कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. ही सगळ्यात मोठी समस्या आहे.
अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्यावर तुमच्या किडनीला त्रास होऊ शकतो.
जेव्हा तुमच्या शरीरातली कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, तेव्हा ते ह्रदययासाठी धोकादायक ठरू शकतं आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
अंडी खाल्याने वजन वाढतं. जर तुम्ही दररोज दोनपेक्षा जास्त अंडी खाल्ली तर तुम्ही तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त कॅलरीज सेवन करत असता.
अंड्यांमधील उच्च प्रथिनांच्या प्रमाणामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो आणि शरीरात इन्सुलिन प्रतिरोधकता वाढू शकते.
आरोग्यासाठी अंडीतुमच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी, कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.