Sakshi Sunil Jadhav
लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेला सुट्टी जाहीर केली असेल तर तुम्ही त्यांना इतिहास, संस्कृती आणि देशाच्या गौरवशाली वारशाची ओळख करुन देण्यासाठी मुंबईतल्या काही ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यायला घेऊन जाऊ शकता. पुढे याची दिली आहे.
ब्रिटिश काळातले हे भव्य स्मारक भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहे. अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं हे ठिकाण पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.
युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेले हे रेल्वे स्थानक इंडो-सारसेनिक वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुंबईची ओळख ठरलेलं हे ठिकाण इतिहासप्रेमींना आवडतं.
मुंबई विद्यापीठ परिसरातील हा मनोरा ब्रिटिश स्थापत्यशैलीचा नमुना आहे. बिग बेनच्या धर्तीवर उभारलेला हा टॉवर वारसा प्रेमींसाठी खास आहे.
घारापुरी बेटावर वसलेली ही लेणी प्राचीन शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहेत. भगवान शिवाशी संबंधित शिल्पं ईथे पाहायला मिळतात.
महात्मा गांधींच्या मुंबईतील वास्तव्याची आठवण जपणारे हे ठिकाण आहे. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास तुम्हाला इथे अनुभवता येईल.
बौद्ध काळातील ही लेणी शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखली जातात. इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम येथे दिसतो.
पोर्तुगीज काळातील हा किल्ला ऐतिहासिक युद्धांचा साक्षीदार आहे. छायाचित्रण आणि इतिहास अभ्यासासाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे.
हा किल्ला ब्रिटिश काळातील महत्त्वाचं ठिकाण मानला जातो. आजही फोर्ट परिसरात त्याचे अवशेष पाहायला मिळतात.