Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना हार्टच्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. पण याचं फक्त आजार पण नाही तर इतरही कारणं असतात.
औषधं आजार बरे करण्यासाठी असतात, पण काही औषधं नकळतपणे हृदयाला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. प्रसिद्ध हृदयतज्ज्ञ डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.
इबुप्रोफेन, नॅप्रोक्सेन यांसारखी वेदनाशामक औषधे सतत किंवा जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.
काही औषधांमुळे शरीरात पाणी साचण्याची शक्यता असते, त्याने हृदयावर ताण येऊन हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो.
डॉक्सोरुबिसिन, ट्रास्टुझुमॅब यांसारखी औषधे हृदयाच्या स्नायूंना कमकुवत करू शकतात. केमोथेरपीदरम्यान आणि नंतर अनेक रुग्णांची हृदय तपासणी केली जाते, कारण या औषधांचा हार्टवर परिणाम होऊ शकतो.
अॅम्फेटामाइन्ससारखी औषधे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवू शकतात.
हृदयाशी संबंधित आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींमध्ये ही औषधे हृदयाचे ठोके अनियमित करू शकतात.
रोसिग्लिटाझोनसारखी जुनी डायबेटीस औषधे हृदय निकामी होण्याचा धोका वाढवू शकतात.
प्स्यूडोइफेड्रिन असलेली औषधे रक्तदाब वाढवतात आणि हृदयाच्या गतीवर परिणाम करू शकतात.
उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असलेल्या रुग्णांनी कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.