Manasvi Choudhary
योग्य आहार घेणे हे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे असते.
शरीरामध्ये आम्लाचे प्रमाण वाढवणारे अॅसिडीक पदार्थ रिकाम्या पोटी खाणे टाळावे.
सकाळी रिकाम्यापोटी सोडा पिऊ नये, सोडा प्यायल्याने पोटामध्ये गॅस होतो ज्यामुळे पोटात गॅसची समस्या होते.
अनेकजण दिवसाची सुरूवात फळे खाऊन करतात, मात्र सकाळी रिकाम्या पोटी लिंबू, संत्री, द्राक्षे ही फळे खाऊ नये
संत्री खाल्ल्याने पोटात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होते. त्यामुळे पोट फुगते.
सकाळ रिकाम्या पोटी कॉफी पिऊ नये कॉफीमध्ये कॅफिन असते जे रिकाम्या पोटी सेवन केल्याने पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होते.
मसालेदार अन्न सकाळी रिकाम्या पोटी खाणे टाळा.