ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्याला कोणत्याही वेळी काहीही खाण्याची सवय असते. मात्र प्रत्येक वेळ खाण्यासाठी योग्यच असते असं नाही.
काही पदार्थ हे दिवसा खाल्याने फायदा होतो, तर काही पदार्थ रात्री खाल्याने फायदा होत असतो.
अनेकांना रात्री कॉफी पिण्याची सवय असते. मात्र रात्री कॉफी प्यायल्याने झोप येत नाही कॉफीत कॅफेन असते जे मेंदूला ॲक्टिव्ह करते. ज्यामुळे झोप उडते. म्हणून रात्री कॉफी पिऊ नये.
काकडी दिवसाच खावी. पण जर तुम्हाला संध्याकाळी खायची असेल तर ७ वाजेच्या आधी खावी.
रात्री काकडी खाऊ नये. काकडी पचायला जड असते. त्यामुळे रात्री उशीरा काकडी खालल्याने पचनसंस्थेवर त्याचा वाईट परिणाम होतो.
मिठाई खाणे सर्वांनाच आवडते. पण रात्री गोड खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. रात्री उशीरा गोड खाल्ल्याने झोपेला बाधा होऊ शकते. गोड खाल्ल्याने मेंदू ॲक्टिव्ह होतो, ज्यामुळे झोप उडते.
रात्री झोपण्यापूर्वी ओला खोबरे खाणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. पचन पोटाविषयीच्या समस्या उद्भवत नाहीत.
रात्री दोन विलायची, अद्रकचा छोटा तुकडा, थोडीशी लवंग आणि धने बारीक करा. हे पावडर गरम पाण्यासोबत घ्या. पोटासंबंधीत सर्व समस्या दूर होतील.