Bharat Jadhav
बहुतेकांना नरम नरम गादीवर झोपण्याची आवडतं. परंतु तुम्हाला माहिती आहे का? जमिनीवर झोपण्याने अनेक खूप काही फायदे होत असतात.
जमिनीवर झोपल्यानं रक्तभिसरण चांगले होत असते. त्यामुळे ताण कमी होत असतो. त्यामुळे नरम नरम गादीवर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपावे.
जमिनीवर झोपल्यानं सांधेदुखीपासून आराम मिळत असतो. मांसपेशीमधील ताण कमी होत असतो.
जमिनीवर झोपण्याने शरीराच्या आकारात सुधारणा होत असते. मणके सरळ राहण्यात मदत मिळत असते. मान, खांदे, कंबर दुखत नाही.
जमिनीवर झोपल्यानं शरीरातील तापमान थंड ठेवण्यास मदत होत असते. त्यामुळे झोपण्याची गुणवत्ता सुधारत असते.
सुरुवातीला जमिनीवर झोपण्याने त्रास होत असतो. परंतु जेव्हा जमिनीवर झोपण्याची सवय होते त्यानंतर शरीरातील रक्तभिसरणात सुधारणा होत असते. आणि झोप चांगली होत असते.
जमिनीवर जेव्हा झोपणार असाल तर सरळ झोपलं पाहिजे. तसेच झोपण्यासाठी चटाईचा वापर केला पाहिजे. सुरुवातीला कमी जाडीची गादी आणि एक उशी घ्यावी. त्यानंतर हळूहळू गादी आणि उशी वापरणं बंद करावं.