Health Tips: डायबिटीस टाळण्यासाठी काय करावं?

Rohini Gudaghe

सकाळचा नाश्ता

सकाळची नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं डायबिटीस टाळण्यासाठी दिवसाची सुरूवात पौष्टिक आहाराने करा.

Breakfast | Yandex

सतत हालचाल

बराच वेळ बसून काम केल्यानेही अनेकदा डायबिटीसची समस्या उद्भवते. त्यामुळं दर अर्ध्या तासाला जागेवरून उठण्याचा आणि काही हालचाली करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

Exercise | Yandex

लवकर झोपा

डायबिटीसची समस्या रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या लोकांमध्ये जास्त आढळते. झोपेच्या अभावामुळे डायबिटीसचा धोका अधिक वाढतो. त्यामुळं लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.

Sleep Well | Yandex

धूम्रपान मद्यपान टाळा

साधारण लोकांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्या लोकांना डायबिटीसचा धोका अधिक आहे. त्यामुळं शक्य तितकं या गोष्टी टाळा.

Avoid Smoking | Yandex

गोड पदार्थ

डायबिटीसची समस्या टाळायची असेल तर गोड पदार्थांपासून दूर राहा.

Avoid Sugar | Yandex

भरपूर पाणी प्या

डॉक्टर दिवसाला सामान्यत: 5-6 लीटर्स पाणी पिण्याचा सल्ला देतात. कमी पाणी पिल्यामुळं रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.

Drink Water | Yandex

लवकर जेवा

रात्री उशिरापर्यंत जागल्याने भूक लागते. रात्री उशिरा जेवल्यामुळे तुम्हाला डायबिटीसचा त्रास होऊ शकतो. दररोज तिन्ही वेळा चौरस, संतुलित, पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करा.

Dinner | Yandex

डिस्क्लेमर:

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: नाकात तूप टाकण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

Benefits Of Ghee | Yandex
येथे क्लिक करा...