Vishal Gangurde
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या मेंदूवर होऊ लागला आहे.
बदल्या जीवनशैलीतील काही सवयी ब्रेन स्ट्रोकला आमंत्रण देणाऱ्या ठरू लागल्या आहेत.
धुम्रपान केल्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका होऊ शकतो.
लठ्ठपणा आणि रक्तदाब वाढवणारे अन्नाचे सेवन केल्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते.
बैठी जीवनशैलीमुळे लोक व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. ही सवय ब्रेन स्ट्रोकला आमंत्रण देते.
अति प्रमाणात मद्यपान केल्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका संभवतो.
ताणामुळे उच्च रक्तदाब होतो, त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते.
पाणी न पिण्यामुळे डिहाइड्रेशन होतं. या डिहाइड्रेशन आणि रक्ताचा चिकटपणा वाढल्याने ब्लड क्लॉट होतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते.