ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आरोग्याचा खजिना ड्राय फ्रुट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
यापैकी सर्वात खास म्हणजे 'काजू' काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.
बदामाप्रमाणे भिजवलेले काजू खाणेही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
भिजवलेले काजू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती निरोगी राहते.
काजूचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. ते भिजवून नियमितपणे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.
नियमित भिजवलेले काजू खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. त्याचा सर्वात मोठा परिणाम बद्धकोष्ठतेवर होतो. रात्री भिजवलेले काजू सकाळी खाल्ल्याने तुमची पचनक्रिया मजबूत होते.
काजूमध्ये आढळणारे फायबर तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. भूक न लागल्यामुळे अतिरिक्त चरबी पोटात साठत नाही. यामुळे काजू खाल्याने वजन कमी होते.