Priya More
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक जण अॅसिडीटीच्या त्रासाने त्रस्त असल्याचे पाहायला मिळते.
अॅसिडीटीमुळे वजन वाढणे, डोकेदुखी, उलट्या, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, जेवण न जाणे अशा अनेक समस्या निर्माण होतात.
अॅसिडीटीवर योग्यवेळी उपचार करणे खूपच गरजेचे असते. त्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करु शकता.
अॅसिडीटीवर आवळा अतिशय गुणकारी आहे. त्यासाठी तुम्ही रोज एक चमचा आवळा पवाडरचे सेवन करा.
अॅसिडीटीसाठी केळी फायदेशीर आहे. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पोटाच्या आरोग्यासाठी केळीचा फायदा होतो.
अॅसिडीटीत होणारा त्रास थंड दुधात साखर मिसळून प्यायल्यामुळे कमी होतो. पोटातमध्ये होणारी जळजळ थंड दुधामुळे कमी होते.
अॅसिडीटी आणि छातीत जळजळ होत असेल तर ताक जरुर प्या. यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल.
अॅसिडीटीचा त्रास आणि छातीत जळजळ होत असेल तर तुळीची पानं खा. यामुळे आराम मिळतो.
अॅसिडीटीवर पुदिना देखील गुणकारी आहे. त्यासाठी पुदिन्याची पानं पाण्यात उकळून घ्या आणि ते पाणी प्या.
बडीशेपमुळे पोटाला थंडावा मिळतो. त्यामुळे जेवल्यानंतर बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते.