Shraddha Thik
व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही अशी तक्रार बरेच जण करतात.
कमी वेळेत जास्तीत जास्त शारीरिक हालचाल करण्यासाठी केलेलं वर्कआउट तुम्हाला नक्कीच मदत करेल.
आठवड्यातून तीन वेळा दहा मिनिटांसाठी जलद गतीने व्यायाम केल्यास तोही फायदेशीर ठरू शकतो.
त्यात तुम्ही चालणे, धावणे, नाचणे, कार्डिओ अशा कोणत्याही व्यायाम प्रकाराचा समावेश करू शकता.
उत्तम आरोग्यासाठी पोषक आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे.
पोटाचे व्यायाम केल्यानं पोटाच्या स्नायूंसोबतच फुफ्फुसांचंही आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते. पोटाचे व्यायाम करताना दीर्घ श्वास घेतला जातो, ज्याचा फुफ्फुसांना फायदा होतो.
अतिरिक्त स्क्रीनटाइम डोळ्यांच्या आजारांना आमंत्रण देऊ शकतं. दिवसभरात इतर व्यायामासोबतच डोळ्यांचे सुद्धा व्यायाम करणं आवश्यक आहे.