Shraddha Thik
आपल्या भारतीय शास्त्रानुसार घरात चप्पल घालणे चुकिचे आहे. परंतू घरात चपला किंवा स्लिपर्स घालणे ही सध्याची फॅशन आणि गरज बनली आहे.
संधिवात आणि हाडांच्या समस्या तसेच टाचा दुखण्यांच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी घरात स्लिपर्स घातल्याच पाहिजेत, असं डॉक्टर सांगतात.
बहुतांश महिलांचा सकाळचा आणि संध्याकाळचा असा कमीतकमी प्रत्येकी दोन- दोन तासांचा वेळ स्वयंपाक घरात जातोच.
स्वयंपाक घरातली बहुतांश कामे सर्वच महिला या उभ्यानेच करत असतात. यामुळे टाचेवर खूप दाब येतो. याचा परिणाम साधारण चाळिशीनंतर बहुतांश महिलांना टाचेचं दुखणं सुरू होऊ लागते.
त्यामुळेच जर महिलांनी स्वयंपाक घरातही कामं करताना चप्पल वापरली तर हा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. यासाठी ज्या चपलेचा सोल थोडा जाडसर असेल अशी चप्पल वापरावी.
जर स्वयंपाक घरात स्लिपर्स घालणं तुम्हाला अजिबातच पटत नसेल तर ओट्याच्या खाली फरशीवर एखादे जाडसर गालिचा किंवा पायपुसणे अंथरुण ठेवा.
स्वयंपाक घरात ठेवलेल्या पाय पुसण्यांवर उभे राहूनच काम करा. जर पायपुसणं पातळ असेल एकावर एक दोन- तीन पायपुसणे टाका आणि त्यावर उभं राहून काम करा. यामुळेही टाचदुखीचा त्रास टाळला जाऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.