Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा कढीपत्ता आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
कढीपत्ता हा त्याच्या गुणधर्मामुळे पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरला जातो.
कढीपत्त्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम ही पोषकतत्वे असतात.
पाण्यात कढीपत्ता टाकून प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
कढीपत्त्यामध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता खाल्ला जातो.
डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी कढीपत्त्याचे सेवन केले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.