ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लघवी म्हणजे शरीराला डिटॉक्स करणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
लघवीला जाणं ही रोजच्या दिनचर्येतील आपल्यासाठी एक साधारण आणि नैसर्गिक क्रिया आहे.
तुम्ही दिवसांतून किती वेळा लघवीला जाता याचा कधी विचार केला आहे का?
त्यामुळेच आपण किती वेळा लघवी करतोय हे ही माहित असणे आरोग्यिकदृष्ट्या महत्वाचे आहे.
दिवसभरात लघवीला जाण्याचं सामान्य प्रमाण हे ६-७ वेळा आहे. म्हणजेच २४ तासांत किमान ६-७ वेळा तरी लघवी करणं गरजेचं आहे
एखादी महिला गरोदर असल्यास वारंवार लघवीला येण्याची समस्या जाणवते.
ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या व्यक्तींना किंवा जास्त मीठाचं प्रमाण करणाऱ्यांमध्ये सहसा लघवीला जाण्याचं प्रमाण जास्त असतं.