Priya More
रूमाल आणि टिश्यू हे आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंपैकी एक आहे.
आपल्या पर्समध्ये अथवा खिशामध्ये रूमाल किंवा टिश्यू असतोच. या दोन्ही वस्तूंचा वापर सर्वजण करतात.
चेहरा आणि हात पुसण्यासाठी, मेकअप काढण्यासाठी रूमाल किंवा टिश्यूचा वापर केला जातो.
रूमाल आणि टिश्यू हे दोन्ही आपल्या मूलभूत गरजांचा एक भाग बनले आहे.
वापरासाठी रूमाल आणि टिश्यू दोन्ही चांगले आहे असे म्हटले जाते. पण या दोघांपैकी नेमकं काय चांगलं असा प्रश्न सर्वांना पडतो.
खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर बाहेर पडणाऱ्या विषाणूंचा प्रसार इतर लोकांमध्ये होऊ नये यासाठी रुमालचा वापर आपण करतो.
संशोधनानुसार, पुन्हा वापरता येण्याजोग्या रूमालाने नाक पुसल्यानं किंवा इतर कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यास विषाणू पसरण्याचा धोका असतो.
हवेतून पसरणारे जीवाणू टिश्यूवर इतके दिवस टिकू शकत नाहीत. पण टिश्यूचा वापर केल्यानंतर तो फेकून द्या.
रुमाल श्वासोच्छवासातील एरोसोल प्रभावीपणे फिल्टर करत नाहीत. म्हणजे प्रदूषक आणि जंतू रुमालाद्वारे शरीरात सहज प्रवेश करू शकतात.
टिश्यू हा वापरासाठी चांगला पर्याय आहे. कारण टिश्यू डिस्पोजेबल असल्याने तो विषाणूचा प्रसार रोखतो.