ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या देशभरातले अनेक लोक लठ्ठपणामुळे हैराण झाले आहेत.
प्रत्येकासाठी एकदा वजन वाढलं की, ते कमी करणे खूप अवघड होऊन जातं.
वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज बरोबर आहार देखील महत्त्वाचा असतो.
सकाळचा नाश्ता नेहमी हेल्दी असावा. यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते, त्याबरोबर वजन कमी करण्यास मदत होत असते.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळच्या नाशत्यामध्ये स्पाउट्स आणि सलाड खाऊ शकता. हे खाल्याने तुमच्या शरीराला फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स सारखी जीवनसत्वे मिळतील.
मूग डाळीच्या पोळ्यामध्ये खूप प्रोटीन असल्याने ते आपली भूक कंट्रोल ठेवण्यास मदत करतात.
सकाळच्या नाशत्यासाठी दलिया खाणे एक उत्तम पर्याय आहे. यामुळे आपले पोट जास्त वेळ भरलेले राहते.
वजन कमी करण्यासाठी रव्याचा उपमा एक उत्तम हेल्दी नाश्ता आहे.
NEXT: अमृताहुनी सुंदर तुझं रुप