ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा केळी आणि दूध एकत्र कालवून खाल्ले जाते
मात्र केळी आणि दूध एकत्र खाण्याचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहेत.
दूध आणि केली एकत्र खाल्ल्याने आपल्या मांसपेशी मजबूत होतात त्याबरोबरच वजनही कमी होते.
दूधात कॅल्शियम, प्रोटीन विटॅमिन बी असे पोषक घटकं असतात. तर केळीमध्ये फायबर आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम असते.
दूध आणि केळीचं एकत्र सेवन केल्यानं पोटात गॅस, सर्दी, खोकला यासांरखे आजार होण्याची शक्यता असते.
जर दूध आणि केळ खायचेच असेल तर दोन्ही पदार्थामध्ये खाण्यासाठी वेळेचे अंतर असावे