ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जून महिना सुरू झाला की सर्वत्र पावसाची रिमझिम आणि हिरवागार वातावरण.
हिरव्यागार वातावरणात बाजारात राजभाज्या दिसू लागतात.
नेहमीच्या या भाज्यापेक्षा या भाज्या दिसायला आणि चवीला वेगळ्या असतात.
रूचकर ,पौष्टिक या रानभाज्या खाल्याने प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
टाकळा ही रानभाजी असून ती पावसाळ्यात उगवते मेथीच्या भाजीप्रमाणे ती दिसते. परंतु, चवीला थोडी वेगळी लागते.
टाकळ्या या भाजीमध्ये उष्ण गुणधर्म असल्यामुळे वात व कफदोषावर मात करण्यास मदत करते.
कुरडू ही रानभाजी शेताच्या बांधावर शेतात पडीत जमीनीवर उगवते. पावसाळ्यात या भाजीचे सेवन केले जाते.
बहुगुणकारी कुरडू या भाजीची पाने शिजवून ती केली जाते. भाजी ही खोकला, कफविकार यासाठी फायदेशीर आहे. याच्या फळातील बिया किडनी स्टोनसाठी उपयुक्त ठरतात.
पावसाळ्यात उगवणारी कर्टोली रानभाजी अनेकांना माहित आहे. दिसायला कारल्यासारखी असून तिची चव कडवट असते.
या भाजीची वेल कारल्यासारखी असते. डोकेदुखीच्या कोणत्याही त्रासांवर ही भाजी फायदेशीर ठरते. यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मुबलक असतात तर कॅलरीज अत्यल्प असतात.
भारंग ही भाजी उगवण्यापूर्वी अर्थात कोवळी असताना तिला तोडली जाते. याच्या पानाच्या कडा या कडक व काटेरी असतात. यांच्या पानांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.