Chetan Bodke
ड्रॅगन फ्रुट हे आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असून या फळाचे उत्पादन राज्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
हे फळ अनेक आजारांवर व त्वचेसाठी गुणकारी असून राज्यात मोठ्या प्रमाणावर या फळाची मागणी आहे.
या फळाची शेती इस्रायल, व्हिएतनाम, दक्षिण अमेरिका आणि भारत देखील केली जाते, ड्रॅगन फ्रुट सोबतच पिताया देखील त्याला बोलले जाते.
इतर देशांप्रमाणे भारतातही या फळाला सर्वाधिक मागणी आहे, चला तर जाणून घेऊया या फळाचे फायदे
या फळामध्ये कॅलरीज कमी असतात पण पोषकतत्त्वे जास्त असतात. हा फायबर,व्हिटॅमिन सी आणि अनेक ब जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे.
या फळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती सर्वाधिक असून सर्दी, फ्लू आणि सर्दी सारख्या आजारांपासून संरक्षण करते.
फळामध्ये फायबरचे प्रमाण सर्वाधिक असल्याने पचन प्रक्रिया आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.
सोबतच ड्रॅगन फ्रुट शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत करते.
ड्रॅगन फ्रुटमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण सर्वाधिक असल्याने चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डागही दूर करण्यासाठी मदत करते.