Priya More
आपल्या बदलत्या लाईफस्टाईलचा सर्वात जास्त परिणाम हा आपल्या झोपण्यावर होतो.
काहींच्या झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. काही ३ ते ४ तास झोपतात. तर कोणी १२ ते १३ तास झोपतात.
अभ्यासानुसार, प्रत्येकाने फक्त ८ ते ९ तासांची म्हणजेच पुरेशी झोप घेणे गरजेचे असते.
जर तुम्ही ९ तासांपेक्षा जास्त वेळ झोपलात तर तुम्हाला लठ्ठपणाचा सामना करावा लागेल.
जास्त झोपल्यामुळे तुम्हाला हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.
जास्त झोपणाऱ्या लोकांना डायबिटीज आणि कॅन्सरचा धोका जास्त असतो.
जास्त झोप घेणाऱ्या लोकांच्या पचनक्रियेवर मोठा परिणाम होतो.
जास्त वेळ झोपल्यामुळे तुन्हाला डिप्रेशन देखील येऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा.
जर आपली झोप पूर्ण नाही झाली तर आपला दिवस चांगला जात नाही. सतत मरगळ आणि आळस येतो.