Shraddha Thik
हिवाळ्यात सकाळी उठणे कठीण आणि कंटाळवाणे होते. सकाळी उठण्यासाठी लवकर झोपणेही गरजेचे आहे.
सकाळी उठल्यावर ही छोटी कामे करा, दिवसभर राहाल फ्रेश आणि निरोगी.
दिवसाची सुरवात करण्यासाठी रात्री लवकर झोपल्याने सकाळी लवकर जागही येते. तसेच आरोग्यासाठी हे फायदेशीरही आहे.
रोज उठल्यानंतर पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. आपण किमान एक ग्लास पाणी प्यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाण्यात मध, लिंबू किंवा हळदही टाकू शकता. पाणी प्यायल्यानंतरच चहा किंवा कॉफी प्या.
शारीरिक आरोग्यासोबतच आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचा मुलायम आणि सुंदर बनवण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा आहारात समावेश करा. यासाठी अक्रोड खा.
सकाळी लवकर ऑफिसला जायचे असल्यामुळे धान्यासाठी वेळ मिळत नाही. त्यासाठी नियमीत 10 मिनिटे ध्यान केल्याने आरोग्य आणि मन राहील चांगले.
तणाव मुक्तीसाठी सूर्यनमस्कार करा. दररोज सुमारे 7 मिनिटे वेळ काढून सूर्यनमस्कार करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.