ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा हा ऋतू जितका आनंददायी वाटतो तितकाच या काळात आजारांचा धोकाही जास्त असतो.
या ऋतूत निरोगी राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यात पचनाच्या समस्या आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो
यामुळेच असे काही पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाल्ले तर आरोग्यास त्रासदायक आहे.
स्ट्रीट फूड खाण्यास चवदार असू शकते. पावसाळ्यात ते टाळण्याचा सल्ला दिला जातो.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ पूर्णपणे स्वच्छ नसतात, त्यामुळे ते लवकर दूषित होऊ शकतात.
चाट, पकोडे, समोसे असे सर्व रस्त्यावरचे पदार्थ पचनासाठी चांगले नसतात. या तेलकट पदार्थाने त्रास उद्भवतो.
यामुळेच पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे.