ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खजूर हे पोषण तत्वांनी भरलेले फळ आहे, ज्याचे अधिक प्रमाणात जास्त सेवन केल्यास आरोग्यास हानिकारक ठरु शकते.
जास्त प्रमाणात खजूर खाल्याने वजन वाढू शकते कारण खजूरात कॅलरीज अधिक प्रमाणात असतात.
खजूरात फ्रुक्टोज असते, जास्त सेवन केल्यास ब्लड शुगर वाढू शकते आणि त्यामुळे ऍलजीची समस्या देखील उद्भवू शकते.
जास्त फायबरमुळे पोटात गॅस आणि फुगवटा येऊ शकतो.
खजूरमध्ये पोटॅशियम असते, ज्याचे जास्त सेवन केल्याने मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो.
खजूर जास्त प्रमाणात खाल्याने दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात.
खजूरमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हेमोक्रोमॅटोसिस होऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.