Priya More
अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूच्या ५ वर्षांनंतर तिचा पती बोनी कपूर यांनी मोठा खुलासा केला आहे. श्रीदेवीच्या मृत्यूमागचे कारण त्यांनी सांगितले.
श्रीदेवी क्रॅश डाएट करत होती. त्यामुळेच तिला अनेक समस्या होत्या. या डाएटनेच तिचा जीव घेतला, असे बोनी कपूर यांनी सांगितले.
क्रॅश डाएट म्हणजे सर्वात कमी वेळामध्ये वजन कमी करण्याची पद्धत आहे.
क्रॅश डाएटमध्ये तुम्ही वेगामध्ये वजन कमी करू शकता. पण यामुळे शरीराला मोठं नुकसान होऊ शकते.
संशोधनानुसार, सतत उपाशी राहून वजन कमी करण्याच्या नादामध्ये अनेकांमध्ये डायबिटीजचा धोका वाढतो.
क्रॅश डाएटमध्ये तुम्ही कमी किंवा मेंटेंड कॅलरी इंटेक करता. त्यामुळे तुमचे वजन झटक्याने कमी होण्यास मदत होते.
क्रॅश डाएटमुळे डिसऑर्डर, मसल लॉस, हेअर लॉस, डिप्रेशन एंजाइटी यासारख्या समस्या होऊ शकतात.
क्रॅश डाएटमध्ये उपाशी राहिल्यामुळे झोप येत नाही. जर ही समस्या सतत होत राहिली तर स्लिपिंग डिसऑर्डर होऊ शकतो.
क्रॅश डाएटमध्ये साधारणत: कार्बोहायड्रेट्स किंवा फॅट्स असलेले अन्न पूर्णपणे बंद केले जाते.
क्रॅश डाएटमुळे मांसपेशिंना नुकसान पोहचते. हे तुमच्या आरोग्यासाठी खूपच घातक असते.
क्रॅश डाएटमुळे तुमच्या आरोग्यासोबतच त्वचेवर देखील गंभीर परिणाम होतो. त्वचेवर पूरळ येण्याची आणि कोरडी पडण्याची शक्यता असते.
क्रॅश डाएट करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर हेल्थ एक्सपर्टचा सल्ला घेणं गरजेचा आहे.